वृत्तवाहिनीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट; एकावर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/crime-2-2.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर एका पोस्टवर एकाने अश्लील कमेंट केली. त्यावरून कमेंट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
अक्षय श्रीमंत कसबे (वय 30, रा. भीमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली) यांनी गुरुवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय अ. नायकिंदे (पुर्ण, नाव पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर भोंगे जबरदस्तीने काढले जात असतील तर रिपाईचे कार्यकर्ते मशिदीला संरक्षण देतील अशी पोस्ट होती. या फेसबुकच्या पोस्टवर आरोपी नायकिंदे याने अश्लील भाषा वापरत “तुझ्याकडे कार्यकर्ते आहेत का, अशी विचारणा केली. तसेच फिर्यादी यांच्या नेत्यांबाबत अश्लील भाषेत आक्षेपार्ह कमेंट करून भावना दुखावल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.