breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

कार पार्किंगसाठी आता पैसे !

  • ‘पीपीपी’ तत्वावर बहुमजली पार्कींग करणार
  • पिंपरी आणि चिंचवडमध्ये पार्कींगचे नियोजन

पिंपरी । महान्यूज विशेष प्रतिनिधी ।

शहरातील गर्दीची ठिकाणे असणाNया पिंपरी भाजी मंडई, क्रोमा शो – रूम आणि चिंचवड रेल्वे स्टेशन या तीन ठिकाणी अद्ययावत असे बहुमजली पार्कींग करण्यात येणार आहे. सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर हे पार्कींग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पार्कींगची सोय होणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख असून वाहनसंख्या १६ लाखाच्या पुढे आहे. नागरिक विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनाने ये – जा करत असतात. हे करताना वाहनांचे पार्कींग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक जटील प्रश्न बनला आहे. औद्योगिकनगरी म्हणून नावलौकीक असणारे पिंपरी – चिंचवड हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. शहराचा विकास साधत असताना लागणाNया पायाभुत सुविधा, दळणवळण व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, उद्याने, जलतरण तलाव, मैदाने, वाहनतळ व्यवस्था यासारख्या अनेक बाबी महापालिकेला नागरिकांच्या सोयीसाठी कराव्या लागतात.

महापालिका हद्दीत दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येच्या मानाने वाढत्या वाहनांसाठी पार्कींगची सोय करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी १ जुलै २०२१ पासून ‘पे अ‍ॅण्ड पार्वâ’ ही योजना रस्त्यांवर काही प्रमुख ठिकाणी सुरू करण्यात आली. तरीही पार्कींगचा प्रश्न शहरात जटील बनला आहे. त्यामुळे शहरात गर्दीच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर वाहनतळ उभारणे ही बाब प्रशासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी महापालिकेच्या वाहनतळ आरक्षित जागांची अतिरिक्त आयुक्त यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी उड्डाणपुलाजवळील जुन्या भाजी मंडईजवळ, पिंपरीतील क्रोमा शो-रूम जवळ आणि चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ जागा उपलब्ध आहे.

या तीनही ठिकाणी अद्ययावत असे बहुमजली पार्कींग व्यवस्था करणे शक्य होणार आहे. याशिवाय या जागा वाहनतळ आरक्षणाच्या असून महापालिकेच्या मालकीच्या आहेत. या ठिकाणी सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) द्वारे बहुमजली पार्कींग व्यवस्था करता येणे शक्य आहे. ही तीनही ठिकाणे अतिशय गर्दीची असून त्याठिकाणी पार्कींग व्यवस्था केल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पार्कींगची सोय होणार आहे. तसेच वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. वाहन चालकांना शिस्त लागेल. तसेच महापालिका उत्पन्नातही भर पडेल. यासाठी तज्ञ सल्लागारामार्पâत या जागेचा पार्कींग आराखडा आणि सविस्तर विनंती प्रस्तावही (आरएफपी) तयार करण्यात आला आहे.

ठिकाण । क्षेत्रफळ (चौ.मी.) । पार्कींग प्रकार
जुनी भाजी मंडई पिंपरी ५६००रॅम्प
क्रोमा शो-रूमजवळ पिंपरी २४८७ । रॅम्प
चिंचवड रेल्वे स्टेशजवळ ३९१० रॅम्प

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button