महापालिका शिक्षण विभागाची जी जी इंटरनॅशनल स्कूलला नोटीस
![Notice to GG International School of Municipal Education Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/school-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे गुगल ऍक्सेस बंद केल्याने जी जी इंटरनॅशनल स्कुलला महापालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. या बाबत 3 दिवसात खुलासा करण्याबाबत शाळेच्या प्रशासनाला सांगितले आहे. अन्यथा प्रशासकीय मान्यता काढून घेण्याचा इशारा नोटीस मध्ये देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी ही नोटीस पाठवली आहे.
नोटीस मध्ये नमुद केले आहे की, शालेय व्यवस्थापन पालकांना संपुर्ण फी एकरकमी भरण्याची सक्ती करत आहे. ज्यांनी फी दिली नाही, त्या विद्यार्थ्यांचे गुगल ऍक्सेस बंद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या निदर्शनास ही बाब आली आहे. तसेच पालकांनीही या बाबत तक्रारी केल्या आहेत.
फी अभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे बंद करणे शिक्षण संहितेचा भंग करणारे आहे. त्वरित विद्यार्थ्यांचा गुगल ऍक्सेस सुरू करावा. तसेच त्याबाबत 3 दिवसात समक्ष हजर राहून खुलासा करण्याची सुचना देण्यात आली आहे. खुलासा असमाधानकारक असल्यास बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम 2009 कायद्यानुसार कारवाई करू, असा इशारा शिंदे यांनी नोटस मध्ये दिला आहे.