breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमुंबई

निवडून आल्यानंतर रंग दाखविणारा खासदार पुन्हा नको : मेहबूब शेख

पनवेल शहरात संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य कामगार मेळावा

नवी मुंबई: दहा वर्षे खासदार निवडून दिला. त्या “श्री”रंगाचे आपण रंग पहिले आहेत. एकदा निवडून आले की, ते परत तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे हे रंग दाखवणारे‌ खासदार पुन्हा नको, हा निश्चय मावळ लोकसभेतील मतदारांनी केला आहे, अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केली आहे. तसेच, दुसरीकडे आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कोणतीही जबाबदारी मिळाल्यानंतर प्रशंसनीय काम करून दाखवलेले आहे. याची खात्री मतदारांना पटली असून त्यांचा विजय पक्का असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मावळ लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना समाजाच्या सर्वच स्तरांतून भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील खांदा वसाहत येथील आगरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात आज शुक्रवार (दि. 3 मे) रोजी असंघटित कामगारांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.‌ त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, मुख्य आयोजिका‌ व कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, भावनाताई घाणेकर, शेकापचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनुराधा ठोकळ, काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष हेमराज नाथाशेठ म्हात्रे, विधी व न्यायसेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. के. एस. पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील, शिवसेनानेते शशिकांत डोंगरे, शिवसेना खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के, दिपक घरत, दिपक निकम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर सेलच उपाध्यक्ष डॉ. अमित दवे, नाना म्हात्रे, युवा सेनेचे औचीत राऊत, पराग मोहिते, शैबाझ पटेल यांच्यासह मेळाव्यासाठी विविध कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवा गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी पी आय (एम), आरपीआय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेहबूब शेख पुढे म्हणाले की, निवडणुकीत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे. कारण भाजपा जर पुन्हा निवडून आली तर आगामी भविष्यात देशात निवडणुका होणार नाहीत. मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो की, माझा जन्म या मातीत आणि सर्व धर्म समभाव मानणाऱ्या देशामध्ये झाला आहे. आपल्या देशात हिंदू बांधव भगवत गीतेप्रमाणे चालतात, मुसलमान बांधव कुराणा प्रमाणे चालतात, ख्रिस्ती बांधव बायबल प्रमाणे चालतात. परंतु भारतीय म्हणून आपण सगळे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. आणि हेच संविधान बदलण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे

मेळाव्याच्या मुख्य आयोजिका श्रुती श्याम म्हात्रे प्रास्ताविक करताना म्हणाल्या की, असंघटित कामगार वर्ग हा उपेक्षित आणि वंचित आहे. हा कामगार वर्ग आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. संजोगजी तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या समस्या लोकसभेत मांडाल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्यातील छोट्या विक्रेत्यांसाठी 14 वर्षांपूर्वी युपीएच्या कालखंडामध्ये हॉकर्स कायदा पारित करण्यात आला होता. दुर्दैवानं त्यानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीने हा कायदा लागू केला नाही. आज प्रत्येक घराची गरज असणाऱ्या घरेलू कामगारांची कुठेही शासन दरबारी नोंद होत नाही. त्यांना कुठलेही कायद्याचे संरक्षण नाही, त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत. या सर्वांसाठी आपल्याला भविष्यात काम करायचे आहे. खरंतर हातावर पोट असणाऱ्या या कामगार वर्गासाठी आज कामाचा दिवस आहे. परंतु आपल्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण मोठ्या उत्साहाने एक दिवसाच्या कमाईला तिलांजली देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. या सर्वांना मी विनंती करेन की, संजोग वाघेरे पाटील यांचे “मशाल” हे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.

तेच सत्तेत राहिले, तर कामगारांचे भविष्य अंधाकारात : संजोग वाघेरे पाटील

पाठिंबा देणाऱ्या संघटनांचे आभार मानताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, आज तुमच्यासारख्या असंघटित कामगारांना फार त्रास सहन करावा लागत आहे. जर हीच मंडळी सत्तेमध्ये राहिली, तर कामगारांचे भविष्य अंधकारात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये कामगार कायद्यांच्यात हेतूपूर्वक बदल करण्यात आलेले आहेत. हे सारे बदल भांडवलदार धार्जिणे आहेत. पूर्वी एखादी कंपनी अथवा कारखाना बंद करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागे. परंतु, आता मात्र तीनशे कामगार असलेला कारखाना मालक मनात येईल, तेव्हा बंद करू शकतो. श्रुती ताईंनी फार मोठा संघर्ष केला आहे. कामगारांसाठी त्या सातत्याने कार्यमग्न असतात. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या आंदोलनामध्ये गेलो आहे. तेव्हा तेव्हा त्यांना यश प्राप्त झाले आहे. याचे मला समाधान मनापासून वाटते.

“वो चले थे तवायफोंके कोठे बंद करने, सिक्को की खनक सुनकर खुद मुजरा कर बैठे” – मेहबूब शेख

देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीचा निर्देशांक 10.8 टक्के झाला आहे. सहा कोटी नव्वद लाख करोड लोकांचे रोजगार गेले आहेत. परंतु केंद्र सरकार फक्त जुमलेबाजी करण्यात मश्गूल आहे. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळेजण भारतीय जनता पार्टीत गेल्यावर मात्र पवित्र होतात. भाजपासोबत घरोबा करणा-यांचे दाखले देऊन “वो चले थे तवायफोंके कोठे बंद करने, सिक्को की खनक सुनकर खुद मुजरा कर बैठे”, असे म्हणत मेहबूब शेख टीका केली.

संजोग वाघेरेंच्या पाठीशी एकवटली ‘कामगार शक्ती’

पनवेल येथील विविध कर्मचारी संघटनांनी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत तुफान शक्ती प्रदर्शन केले. कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या कामगार संघटना कार्यरत आहेत. स्वर्गीय कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी असंघटित कामगारांना एकत्र करत विविध संघटनांची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या श्रुती म्हात्रे याच जोमाने या संघटना चालवत आहेत. कोकण श्रमिक संघ, व्यावसायिक विक्रेता संघ, गणेश मार्केट, बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समिती, घरेलू कामगार संघटना, पनवेल हॉकर्स फेडरेशन, गणेश मंदिर ट्रस्ट, रिक्षा चालक संघटना, इमारत बांधकाम कामगार संघटना आदी संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या वेळी सभागृहात “संजोग वाघेरे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “हम सब एक हम है” या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button