राष्ट्रवादीचा मोर्चा महापालिका प्रवेशद्वारावर रोखला; कार्यकर्ते आक्रमक
![NCP's Dr. against BJP. "Jagran Gondhal" at Ambedkar Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/ncp-pcmc-2.jpg)
- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भष्ट्राचाराच्या निषेधार्थ निषेध मोर्चा
- भाजपाविरोधात राष्ट्रावादीचा डॉ. आंबेडकर चौकात “जागरण गोंधळ”
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराविरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जागरण गोंधळ आंदोलन सुरू केले आहे. थोड्या वेळात महापालिका भवनावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.
पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी यांच्या मदतीने भाजपाविरोधी वातावरण निर्मिती करीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष वेधले आहे.
सुरक्षारक्षकांशी कार्यकर्त्यांची हुज्जत…
दरम्यान, महापालिका सुरक्षारक्षकांनी राष्ट्रवादीचा विराट मोर्चा प्रवेशद्वारात रोखला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील प्रवेशद्वाला येवून आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्याची शक्यता आहे. सुरक्षा अधिकारी आंदोलनकर्त्यांना प्रवेश देत नसल्यामुळे काहीवेळी किरकोळ हुज्जत झाली.