राष्ट्रवादी लीगल सेलच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
ॲड. सोनाली घाडगे-पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात दाखल
पिंपरी : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या लीगल सेलच्या अध्यक्षा ॲड. सोनाली घाडगे-पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे.
चिखली येथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या अध्यक्षा ॲड. सोनाली घाडगे-पाटील, ॲड. अदिती निटूरे, यांनी प्रवेश केला. ॲड. सोनाली घाडगे या पीडीसीसी बँकेच्या कायदे सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहे. तसेच, ॲड. अदिती निटूरे या ज्ञानप्रकाश संस्थेच्या अध्यक्षा आहेत व पिंपरी-चिंचवड ॲड. बार असोसिएशनच्या सदस्या देखील आहेत. या प्रसंगी सरचिटणीस लीगल सेल भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर ॲड मंगेश खराबे उपस्थित होते.
हेही वाचा – काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’!
भोसरी विधानसभेतील वकिलांनी यापूर्वीच आमदार महेश लांडगे यांना आपला पाठिंबा दिला होता आणि निवडणुकीपूर्वी हा झालेला पक्ष प्रवेशामुळे पाठिंबा आणखी बळकट झाल्याचे दिसून येते.