breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिक फाटा ते खेड रस्ता होणार आठ पदरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील नाशिक फाटा ते खेड या दरम्यानचा रस्ता आठ पदरी होणार आहे. या कामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शुक्रवारी (दि. 2) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत देशभरातील आठ मुख्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नाशिक फाटा ते खेड या 30 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचाही समावेश आहे.

देशात 936 किलोमीटर अंतराच्या आठ मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 50 हजार 655 कोटी रुपये खर्च होणार आहे. सहा पदरी आग्रा-ग्वाल्हेर राष्ट्रीय हाय स्पीड कॉरिडॉर, चार पदरी खरगपूर-मोरग्राम राष्ट्रीय हाय स्पीड कॉरिडॉर, सहा पदरी थारड-दिसा-मेहसाणा-अहमदाबाद राष्ट्रीय हाय स्पीड कॉरिडॉर, चार पदरी आयोध्या रिंग रोड, चार पदरी पाथलगाव आणि गुलमा रायपुर रांची राष्ट्रीय हाय स्पीड कॉरिडॉर, सहा पदरी कानपूर रिंग रोड, चार पदरी नॉर्थर्न गुवाहाटी बायपास, आठ पदरी एलिव्हेटेड नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉर या मार्गांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा येथून खेड पर्यंत एलिव्हेटेड रस्ता असणार आहे. यासाठी 7827 कोटी खर्च होणार आहे. या मार्गामुळे चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठी मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड आणि चाकणयेथील औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे

हेही वाचा –  “अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे”, सचिन वाझेचा गंभीर आरोप

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. संकेत भोंडवे हे मूळचे पिंपरी चिंचवड येथील आहेत. या एलिवेटेड मार्गाच्या मंजुरीसाठी भोंडवे यांचे योगदान मोठे आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम यानिमित्ताने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे.

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तमाम पिंपरी चिंचवडकर यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button