Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विकासाच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन अमूल्य; माजी विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपळे सौदागर येथील ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा

पिंपरी-चिंचवड | “विकासाच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, सल्ले आणि सूचनांचे अनमोल मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरते. समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे मोल विसरून चालणार नाही,” असे स्पष्ट मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले.

पिंपळे सौदागर येथील ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी गोविंद गार्डन हॉटेलच्या बांसुरी हॉलमध्ये उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात नाना काटे यांच्या हस्ते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक संजय भिसे, डॉ. कुंदाताई भिसे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथ काटे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ आणि सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा   :    पिंपळे सौदागरमध्ये पीके चौकात भीषण अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. शोभा राजगुरे, निर्मला कासार आणि शकुंतला शिंदे यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले. सचिव सखाराम ढाकणे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला, तर खजिनदार सुभाष पाटील यांनी आर्थिक ताळेबंद मांडला. अध्यक्ष डॉ. सुभाष पवार यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या गीत-संगीत मैफलीत प्रसिद्ध गायक भारती न्यायाधीश व संतोष माहेश्वरी यांनी “विसरू नको श्रीरामा मला”, “परदेसीयों से न अंखियाँ मिलाना” आणि “जय जय शिवशंकर” अशा मराठी-हिंदी गीतांनी रसिकांची मने जिंकली. यापूर्वी पद्मा गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भजन सादर केले. प्रकाश दळवी (मृदंग) आणि बाळकृष्ण चौधरी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शकुंतला शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विवेकानंद लिगाडे यांनी केले. या सभेच्या यशस्वीतेसाठी रमेश वाणी, अनिल कुलकर्णी, रमेश चांडगे, अशोक येळंमकर आणि अनिलकुमार शाह यांनी परिश्रम घेतले. ही सभा केवळ एकत्र येण्याचे निमित्त नव्हते, तर समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवांचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी क्षण ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button