जनजागृती करीत “मूर्ती व निर्माल्य संकलन”
!["Murti and Nirmalya collection" by raising public awareness](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-10-at-3.43.03-PM.jpeg)
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला उपक्रम
पिंपरी प्रतिनिधी | प्लास्टिक बंदी, प्लास्टिकचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. याबाबत जनजागृती करीत प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी गणेश तलाव आकुर्डी येथे “मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन” केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी गणेश तलाव आकुर्डी येथे “मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन” केले. तसेच प्लास्टिक बंदी, प्लास्टिकचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन याबाबत जनजागृती केली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी राजू साबळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वछाग्रह उपक्रमाचे प्रोजेक्ट असिस्टंट दत्ता हेंद्रे , प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड, डॉ. दत्तात्रय भांगे हे उपस्थित होते. दत्ता हेंद्रे यांनी कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा पुनर्वापर, प्लास्टिकचे आकारमान कमी कसे करावे तसेच कचऱ्यापासून कंपोस्टिंग कसे बनवले जाते याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी याची माहिती गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दिली. यामध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, डॉ. एच. बी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड, डॉ. दत्तात्रय भांगे यांनी केले.