एक लाखाच्या खंडणीसाठी केला आठ वर्षीय चिमुकल्याचा खून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/WhatsApp-Image-2022-04-20-at-13.50.01.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
एक लाखाच्या खांडणीसाठी एका तरुणाने आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून केला. ही घटना १६ एप्रिल रोजी चिखली येथे घडली. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
बपीलअहमद रईस लष्कर (वय २६, रा. गणेश मंदीरजवळ, हरगुडेवस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे. मूळ रा. काझीडहर, पोस्ट. नरसिंगपुर, जि. सिलचर, आसाम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मण बाबुराम देवासी (वय ८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १६ एप्रिल रोजी किराणा दुकानदार बाबुराम डुंगरराम देवासी यांचा मुलगा लक्ष्मण बाबुराम देवासी हा दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कोणास काहीएक न सांगता घरातुन कोठेतरी निघून गेला. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ लक्ष्मण याचा शोध सुरु केला.
त्याच दिवशी सायंकाळी बाबूराम देवासी याच्या घरापासून २०० मीटर अंतरावर निर्जन पत्र्याच्या शेडमध्ये लक्ष्मण हा मृतावस्थेत सापडला. त्यानुसार पोलिसांनी खुनासाठी अपहरण आणि खून अशी गुन्ह्यात कलमवाढ केली आणि आरोपीचा शोध सुरु केला.
गुंडा विरोधी पथकाने गुन्हा घडल्यापासून घटनास्थळावरील एकूण ८३ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपीचा काहीएक सुगावा नसताना तांत्रिक कौशल्याने आरोपी बपीलअहमद रईस लष्कर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच बाबूराम देवासी यांच्याकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याकरीता लक्ष्मण याचे अपहरण केले. त्यास निर्जन पत्र्याचे शेडमध्ये घेवुन गेला व त्याने आरडा ओरड करुन नये म्हणुन त्यास दगडाने डोक्यात मारुन त्याचा खुन केला असल्याचे आरोपीने सांगितले आहे.
सदरची गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे शाम बाबा, विजय तेलेवार, मयुर दळवी, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी व तौसीफ शेख यांनी केली आहे.