हात्याराने डोक्यात मारहाण करून एकाचा खून
पुणे | हात्याराने डोक्यात मारहाण करून एकाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण आळंदी रोड, चाकण घाट, खेड येथे 26 ते 30 डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला.राधेश्याम सुभाष राठी (वय 45, रा. आळंदी, मुळगाव – वाशिम) खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने शुक्रवारी (दि.31) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम सुभाष राठी यांची यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर सीआरपीसी 174 प्रमाणे कागदपत्रांची तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात इसमाने राठी यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांचा खून केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.