पिंपरी / चिंचवड

छातीत चाकूने भोकसून तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी l प्रतिनिधी
छातीत चाकूने भोकसून तरुणावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी आठ वाजताच्या सुमारास संग्रामनगर झोपडपट्टी ओटास्कीम निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अमोल किसन पवार असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी अमोल यांचे वडील किसन पवार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष बाळू गायकवाड, कार्तिक, शाहीद साजिद शेख, शहानवाज साजिद शेख (सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्कीम निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन पवार यांचा साडू पांडुरंग सर्जेराव ढेकळे यांचा आणि आरोपी शहानवाज शेख याचा वाद झाला. फिर्यादी यांच्या साडूला मारहाण झाल्याने फिर्यादी आणि त्यांची दोन मुले अमोल आणि सुरज असे तिघेजण त्यांना पाहण्यासाठी गेले. मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची मुले साडू पांडुरंग डिगोळे यांना पाहण्यासाठी जात असताना आरोपींनी अमोलवर खुनी हल्ला केला. अमोलच्या छातीमध्ये चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी अमोलच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अमोल गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी संतोष गायकवाड याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button