breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे यांची रायगडला बदली

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे यांची जिल्हा रायगडमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बदली करण्यात आली. मागील काही दिवसापासून त्या बदलीसाठी प्रयत्न करत होत्या. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

26 मे 2018 रोजी ज्योस्ना शिंदे या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. सव्वा तीन वर्षे त्या महापालिकेत होत्या. त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण, शालेय साहित्य वाटपातील अनियमितता या प्रकरणामूळे कायम त्या वादग्रस्त ठरल्या होत्या.शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळताच वरीष्ठांना कोणतीही कल्पना न देता त्या गायब झाल्या होत्या. आठ ते नऊ दिवस त्या गायब होत्या.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील शिंदे यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतले होते. त्यांच्या बदलीची राज्य शासनाकडे मागणी केली होती. गेल्या महिन्यापासून त्यांनी बदलीसाठी हलचाली सुरू केल्या होत्या. अखेर आज त्यांची बदली झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button