ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड-म्हातोबानगर परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम

२४ मीटर डीपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या व बांधकामावर निष्कासनाची कारवाई

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड-म्हातोबानगर येथील २४ मीटर डिपी रस्त्यावरील १५०० चौरस मीटर जागेवरील ४१ अनधिकृत झोपड्या तसेच बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिंदे, दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

महापालिका स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

हेही वाचा     :            पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार 

नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधा, रस्ते व पायाभूत प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. शहराचा नियोजित आणि सुटसुटीत विकास साधण्यासाठी या आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करू नये. तसेच, आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे भविष्यात विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि अशा अतिक्रमणांवर नियमानुसार निष्कासनाची कारवाई केली जाईल, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक सुविधा सक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन दृष्टीने सक्षम करण्यासाठी अतिक्रमण हटविणे अत्यावश्यक आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाहतुकीचा ताण आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता रस्ते रूंदीकरण ही केवळ प्रशासकीय कारवाई नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनमान उंचावण्याशी थेट संबंधित बाब आहे. अशा कारवायांना नागरिकांनी सहकार्य केल्यास अशा कारवाया अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने राबविता येतील. शहर अधिक सुंदर, सुबक आणि सुसज्ज करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील सोयीसुविधांसाठी महापालिकेच्या अशा उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता रूंदीकरण कारवाईस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करतो.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button