युवतींच्या स्वप्नांना महापालिकेचे बळ; उच्च शिक्षणासाठी परदेशात भरारी
पिंपरी : आर्थिक अडचणीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाला मुकणाऱ्या युवतींना महापालिकेकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. यंदाच्या वर्षी महिला व बालकल्याणमधून ८० युवतींनी तर मागासवर्गीय विभागातून ९ युवतींनी त्याचा लाभ घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत ११३ युवतींना या योजनेच्या मदतीने परदेशात उच्च शिक्षण घेण्यास मदत झाली आहे. अशाप्रकारे अर्थसाहाय्य देणारी राज्यातील पिंपरी-चिंचवड ही पहिलीच महापालिका ठरली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील युवतींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. याकरिता समाज विकास योजना विभागातून महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय योजनेंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मुलींना लाभ दिला जात आहे. तसेच, मुलींना अधिकाधिक उच्च शिक्षणाची संधी मिळाल्यानंतर त्या युवतींपासून इतरांना प्रोत्साहन मिळावे. या हेतूने महापालिकेकडून एक वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या उच्च शिक्षणास दीड लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. त्यानुसार महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ८० लाभार्थी युवतींना लाभ दिला, तर आणखी ३९ अर्ज प्रलंबित आहेत. त्यांनाही मार्चपर्यंत दीड लाखाचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. तसेच मागासवर्गीय योजनेतून २०२३-२०२४ मध्ये २४ युवतींनी तर डिसेंबर २०२४ अखेर ९ युवतींना लाभ घेतला आहे.
हेही वाचा : शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा
ही योजना १२ महिने खुली असते. यंदाच्या वर्षी सन २०२४-२०२५ या वर्षांत ३९ अर्ज पेंडिंग असून या योजनेतील अटी व शर्तीनुसार अर्जांची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत एकूण ११३ लाभार्थीं युवतींना पालिकेने अर्थसाहाय्य केले आहे. त्यानुसार एक कोटी ६९ लाख ५० हजार रुपये अनुदान वाटप केले आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमधून महिला व बालकल्याण योजना व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागाने केले आहे.
मागासवर्गीय योजना
२०२४-२५ चालू वर्षी ९ विद्यार्थी
२०२३ – २४ गतवर्षी – २४ विद्यार्थी
१.५ लाखप्रमाणे अनुदान
महिला व बालकल्याण
२०२४-२५ चालू वर्षी ८० विद्यार्थी
२०२३ – २४ गतवर्षी – ९१ विद्यार्थी
१.५ लाखप्रमाणे अनुदान
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महिला व बालकल्याण योजना आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजनाअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींना महापालिका प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य देण्यात येते. उच्च शिक्षणासाठी मुलींना मदत करणारी राज्यातील ही एकमेव महापालिका आहे. प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. या योजनेचा शेकडो युवतींनी लाभ घेऊन उच्च शिक्षणात भरारी घेतली आहे.
– तानाजी नरळे, साहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका