ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाची सतर्कता!

आपतकालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर

पिंपरी : संततधार पडणाऱ्या पावसामुळे तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीसह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष २४ X ७(२४ तास ७ दिवस) कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. रात्रीच्या वेळी देखील पावसामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम रेस्क्यूसाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ (२४ तास ७ दिवस) कार्यान्वित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button