पिंपरी / चिंचवड

महापालिका आणि पोलिसांची संयुक्त पथके सोडवणार वाहतुकीच्या समस्या

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांची संयुक्त पथके शहरातील चौकाचौकांमध्ये निर्माण होणा-या वाहतुकीच्या समस्यांवर काम करणार आहेत. शहरातील विविध चौकांमध्ये भिक्षेकरी मुले, महिला, पुरुष, तृतीयपंथी यांच्या समस्यांवर ही पथके कार्यवाही करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील चौकाचौकांमध्ये भिक्षेकरी मुले, महिला, पुरुष, तृतीयपंथी यांच्या समस्ये संदर्भात तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली.

सिग्नलवर वाहने थांबल्यानंतर पेन, प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्य विकणारी मुले वाहनांच्या भोवती गराडा घालतात. वाहनांच्या काचांवर हात मारून त्यांच्या वस्तू विकत घेण्याची विनंती करतात. परिणामी सिग्नल सुटला तरीही ही मुले हटत नाहीत. यामुळे वाहतूक कोंडी, सिग्नल जम्पिंग आणि अन्य वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. तसेच या विक्रेत्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे.

या समस्येचे तसेच वाहतुकीच्या इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. ओमप्रकाश बहिवाल हे पोलीस पथके आणि पालिकेच्या पथकांमध्ये समन्वय साधून काम करणार आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button