TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत विकास साने ‘रॉक’ ; राष्ट्रवादी, भाजपाला ‘शॉक’

पाणीप्रश्न पेटला : गाव समाविष्ट झाल्यापासून वणवण

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चिखली गावचा समावेश झाल्यापासून गावाला विकासापासून वंचित आहे. पायाभूत सुविधांसाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. आणखी किती दिवस हा अन्याय सहन कराणार? असा सवाल उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी पाणी प्रश्नावरुन अक्षरश: रान पेटवले आहे.
चिखली गावचा समावेश महापालिका हद्दीत होवून आता २० वर्षे होत आली. मात्र,आजही चिखलीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली असून, अनियमित वीजपुरवठ्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, चिखली गावातील सुमारे ८ हेक्टर जमीन संपादित करुन पिंपरी-चिंचवडचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. मात्र, या केंद्रातून चिखलीला पाणी देण्यात येणार नाही, असा दावा करीत विकास साने यांनी ‘फेसबूक लाईव्ह’ केले. त्यामुळे चिखलीच्या विकासाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.
वास्तविक, चिखली गावापुरता विचार केला असता गाव समाविष्ट झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची १५ वर्षे आणि भाजपाची ५ वर्षे शहरात सत्ता आहे. गेल्या २० वर्षांत गावात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या नसतील.त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांना ‘रॉकिंग स्टाईल’ आंदोलन करावे आहे, ही बाब राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांना चिंतन करायला लावणारी आहे.
*

राष्ट्रवादीला घरचा आहेर?
चिखलीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ताकाका साने यांनी ‘तीन टर्म’ म्हणजे तब्बल १५ वर्षे महापालिका गाजवली आहे. अनेक विकासकामांत साने यांचे योगदान आहे. तसेच, राष्ट्रवादीचे समर्थक स्वाती साने यांनीही चिखलीचे पाच वर्षे नेतृत्व केले आहे. त्यामुळे १५ वर्षे राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे चिखलीची धुरा असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना चिखली विकासापासून वंचित कशी? हे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे अपयश आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, विकास साने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? अशी चर्चा असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर साने यांनी केले आंदोलन म्हणजे राष्ट्रवादीला ‘घरचा आहेर’ मानला जात आहे.
*

भाजपाची भूमिका काय?
दरम्यान, विकास साने यांनी ‘सोशल मीडिया’ वर ट्रायल घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे गावातील आजी-माजी आणि इच्छुक उमेदवार एकवटले आहेत. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणार आहे. चिखलीला या केंद्रातून पाणी मिळणार नाही, असा दावा निव्वळ दिशाभूल करणारा आहे, असा प्रतिदावा भाजपाकडून करण्यात आला. त्यासाठी माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, सुरेश म्हेत्रे, विनायक मोरे, दिनेश यादव, संतोष मोरे, अंकुश मळेकर यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ केले. त्यामध्ये महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी चिखलीकरांना आश्वासित केले. जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यामुळे चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव यासह समाविष्ट गावांत पाणी समस्या सुटण्यास मदत होईल. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही करण्यात आले.
*

यश साने यांनी सावध भूमिका…
दुसरीकडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले आहे. चिखली गावचा समावेश महापालिका हद्दीत झाल्यापासून पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत, असे म्हणता येणार नाही. स्व. काकांच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. मात्र, विकास साने यांनी घेतलेल्या भूमिकेची पूर्ण कल्पना नाही. मी सध्या बाहेरगावी आहे. माहिती घेवून माझी भूमिका स्पष्ट करेन, असा सावध पवित्रा यश साने यांनी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button