खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; नीलशे हाकेंच्या वतीने फळवाटप
![MP Srirang Barane's birthday celebrated with social activities; Fruit distribution on behalf of Neelshe Hake](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Nilesh-Hake-780x470.jpg)
पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड युवा सेना शहर संघटक नीलेश हाके यांच्या वतीने दापोडी आनंदवन कुष्ठरोग वसाहत येथे फळ वाटप करण्यात आले.
आनंदवन वसाहतमधील नागरिकांना फळवाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आल्याची भावना नीलेश हाके यांनी व्यक्त केली. या वेळी शिवसेना विभागप्रमुख दीपक शेरखाने, विभाग संघटिका सोनाली नागदेवते, विभाग संघटिका विजेता जाधव यांच्या फळवाटप करण्यात आले.
हेही वाचा – ‘..तरच मी विधानसभेला उभा राहीन’; अजित पवारांचं मोठं विधान
या वेळी उपविभाग प्रमुख अजय कदम, मनोज काची, उपविभाग संघटिका मनीषा मडके, मृणाल हाके, प्रियांका कांबळे, ज्योती निकाळजे, सारिका जाधव, राधा संगीत, मनीषा कोष्टी, निहाल पवार, चिंचप्पा निन्गडळे, पप्पू कांबळे, आदित्य पोळके, करण काळे, गणेश आयाळी उपस्थित होते.