ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पॅनेलसाठी खासदार निलेश लंके यांचा ‘‘रोड शो’’

मिशन- PCMC : वाकड–कस्पटेवस्तीमध्ये पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख–विशालनगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. वाकड येथील कस्पटेवस्ती परिसरात लोकप्रिय खासदार श्री. निलेश लंके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व चारही उमेदवार, आघाडीतील पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेत आशिर्वाद घेतले. नागरिकांनी दिलेल्या प्रचंड समर्थनामुळे परिसरात निवडणूक वातावरण तापले असल्याचे चित्र दिसून आले.

प्रभाग क्रमांक २६ मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार तुषार कामठे, संकेत जगताप, सौ. सारिका कस्पटे आणि सौ. सीमा साठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या निवडणूक चिन्हासमोरील पॅनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा     :          नवी सांगवी प्रभाग क्रमांक 31 ‘धनुष्यबाणाची’ गर्जना; महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जोर

पिंपळे निलख, वाकड, कस्पटेवस्ती, विशालनगर, पार्कस्ट्रीट, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णानाऊ सावेनगर, वेलुनगर बाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स आदी भागांमध्ये आयोजित पदयात्रा व जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विकासाभिमुख भूमिका, थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरील स्पष्ट मांडणीमुळे पॅनेलला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी सांगितले की, नागरिकांच्या विश्वास आणि सहकार्याच्या जोरावरच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधता येईल. तुषार कामठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष असून ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. “विकासाचा संकल्प – जनतेसोबत” हा संदेश देत राष्ट्रवादी शरद पवार पॅनेलचा प्रचार सध्या वेग घेत असून प्रभाग क्रमांक २६ मध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे.

“नागरिकांच्या प्रश्नांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन काम करणे हेच आमचे ध्येय आहे. ‘विकासाचा संकल्प – जनतेसोबत’ या भूमिकेतून पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान कारभार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच विजयाची नांदी ठरेल.”

– तुषार कामठे, शहराध्यक्ष, उमेदवार, राष्ट्रवादी श.प. प्रभाग-26 .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button