पिंपरी / चिंचवड
थेरगाव येथे अज्ञात कारणाने सुनेवर खुनी हल्ला करून सास-याची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Attempted-suicide.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
सुनेवर खुनी हल्ला करून सास-याने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजता बेलठीकानगर थेरगाव येथे घडली.
सुशील सुर्यकांत वनवे (वय 38, रा. बेलठीकानगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुर्यकांत मारुती वनवे (वय 74) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांचे वडील होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सुर्यकांत यांनी फिर्यादी यांच्या पत्नीला अज्ञात कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने हत्याराने डोक्यावर मारहाण केली. त्यात फिर्यादी यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या त्यानंतर आरोपी सुर्यकांत यांनी स्वताच्या घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.