मोशीत ‘दहा मिनिटांत लसीकरण’; सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांचा अभिनव उपक्रम
![moshi 'vaccination in ten minutes'; Innovative initiative of social activist Santosh Barne](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/ad5a2482-7c70-46e1-b31d-3983557774d2.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, कर्तव्यम सोशल फाउंडेशन व ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहेत, लसीकरण मोहिमेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अवघ्या दहा मिनिटांतच प्रत्येकाचे लसीकरण होत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लसीकरण मोहिमेत मोशी परिसरातील सुमारे दहा हजार गरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी ही मोहीम राबवित येत आहे, अशी माहिती संतोष बारणे यांनी दिली. मोशी-देहू रस्त्यावरील सिल्वर गार्डिनिया या गृहप्रकल्पाच्या समोरील जागेत ९ जुलै पासून या मोहिमेला सुरवात झाली असून ही मोहीम १८ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन पार पडले.
दररोज सकाळी दहा ते सायं. ४.३० या दरम्यान कोविशिल्डचे ही लस येथे नागरिकांना सवलतीच्या दरात म्हणजेच केवळ 780 रुपयांमध्ये देण्यात येत आहे. ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर आणि कर्तव्यम फाउंडेशन च्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना सर्व सोयी पुरवण्यात आल्या असून नावनोंदणी, लसीकरण, डॉक्टरांकडून समुपदेशन, ऍम्ब्युलन्स, तज्ञ 15 डॉक्टर्स ची टीम, नर्सेस, 20 हुन अधिक स्वयंसेवक सर्व नागरिकांचे अवघ्या दहा मिनिटांमध्ये लसीकरण करून देण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत, त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे शिवाय तज्ञ दिकत्रांच्या सल्ल्यामुळे सर्वांच्या मनातील समाज गैरसमजही दूर करण्याबाबतची जनजागृतीची केली जात आहे.
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांनीही लसीकरणाच्या ठिकाणी घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत-जास्त लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनावरच ताण देऊन चालणार नाही. प्रत्येकाने आपल्या परीने लसीकरण मोहिमेसाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोनाला हद्दपार करू शकणार आहोत. त्यासाठी हा विधायक उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आम्ही कर्तव्य समजतो म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे लसीकरणाबाबत कोणत्याही माहितीसाठी 8888845803 व 8975402727 या क्रमांकावर संपर्क करावा.
– संतोष बारणे, सामाजिक कार्यकर्ते, मोशी.