breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेचा शाखा उद्घाटनाचा धडाका; पिपंरी विधान सभा मध्ये मनसे शाखेचे उद्घाटन

मनसेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस पि चि प्रभारी ॲड.गणेश अप्पा सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पिंपरी चिंचवड शहरात शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी शाखांची बांधणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महात्मा फुले नगर,भोसरी एमआयडीसी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्‍घाटन करण्यात आले. शहरातील शेकडो तरुणांनी मनसेत प्रवेश करत ताकद उभी करण्याचा सपाटा लावल्याने सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,आगामी निवडणुकांचा मुहूर्त बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसणे सुरू केले असून निगडी, पिंपरी, काळेवाडी, वाकड पाठोपाठ आत्ता पिंपरी येथे मनसेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.पिपरी तील शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी ॲड.किशोर शिंदे, ॲड.गणेश अप्पा सातपुते, रणजित शिरोळे, पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिव रुपेश पटेकर, उपशहर अध्यक्ष बाळा दानवले, राजु सावळे , राजु भालेराव , विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे अंकुश तापकीर मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी चिंचवड शहराचे मनविसेचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. दरम्यान, येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यापाठोपाठ आता पक्ष बळकटीसाठी मनसेने सदस्य संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले आहे.

हेह वाचा – पिंपरी-चिंचवड: चिखलीत २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राला आयुक्तांची मंजुरी!

यावेळी उपविभाग अध्यक्ष कृष्णा बिरूणगीकर, शाखाध्यक्ष काशिनाथ खजूरकर, उप शाखाध्यक्ष रवी कनूरकर, शाखा सचिव चंद्रकांत दोडमनी, सदस्य परशुराम बिरूणगीकर, राजू कनूरकर, खाजप्पा बाणे, अमोल गवंडी, खाजप्पा हरळय्या, राजेश दानवले, सोमनाथ स्वामी, सोमनाथ खंदारे, चंद्रकांत नागनाळकर, प्रेम पाटोळे, गणेश हरळय्या, अर्जुन भालेराव, हनुमंत नाटेकर, तुकाराम वसके, समीर शेख, सतीश दाभाडे,निलेश खिलारे भोसरी उपविभाग अध्यक्ष तुषार सोनटक्के , अंकीत शिदे. निलेश सुर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button