आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते दिनेश यादव यांच्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
![आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते दिनेश यादव यांच्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/WhatsApp-Image-2021-11-09-at-4.44.11-PM.jpeg)
- वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रुपी जनतेच प्रेम पाहून स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव भाऊक
- नगरसेवक व प्रतिनिधींना लाजवेल असं दिनेश यादव यांचं काम-आमदार महेश दादा लांडगे
भोसरी/कुदळवाडी | (प्रतिनिधी)
गेली नऊ ते दहा वर्षे झाली दिनेश यादव हे सामाजिक काम करत आहेत.वाढदिवसाच्या निमित्ताने ते प्रत्येक वर्षी आपल्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडत असतात.स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कुदळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता या वेळी भोसरी मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते दिनेश यादव यांनी एक वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा आज (दि.५) रोजी संपन्न झाला.
यावेळी आमदार महेशदादा लांडगे यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की,दिनेश गेली सात ते आठ वर्ष झालं समाजासाठी अहोरात्र काम करतो आहे.कुदळवाडी परिसरात कामानिमित्त आलेले देशातील असंख्या लोक राहतात.जात धर्म पंथ न बघता तो प्रत्येकाला मदत करत असतो.कोरोना काळात परराज्यातील लोकांसाठी पहिल्यांदा त्यांनी गावी जाण्यासाठी व्यवस्था केली. हे सांगताना आमदार लांडगे म्हणाले,बिहार वरून मला खासदाराचा फोन आला व म्हणाले मी आपला आभारी आहे आपल्या इथून दिनेश यादव यांनी आमच्या लोकांची गावी येण्याची व्यवस्था केली.
कोरोना काळात चारशे ते पाचशे लोकांना रोज त्यांच्या वतीने जेवण देण्यात येत होते.अनेक लोकांना प्लाजमा देण्याचे काम त्यांनी केलं.एखाद्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना लाजवेल असं काम दिनेशच आहे.जुन्या व ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन काम करावे.मी आमदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुदळवाडी परिसरात आग लागली या ठिकाणी रात्रभर आम्ही दोघं व मित्रमंडळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो ही आठवणही त्यांनी या वेळी केली.त्याच्या कामाचा आवाका बघून त्याला स्वीकृत नगरसेवक केलाय अशी कौतुकाची थाप लांडगे यांनी दिली.
आठ ते नऊ वर्ष झाले वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर मांडण्यात येतो.परंतु दोन वर्ष झाले कोरोनामुळे अहवाल जनतेसमोर मांडता आला नाही याची खंत यादव यांनी व्यक्त केली.परिसरातील राहणाऱ्या सर्व जाती,धर्म, पंथातील लोकांना जोडण्याचे काम त्यांनी केले आहे.महेश दादा यांनी दिलेल्या संधीच सोनं त्यांनी केल. वाढदिवसानिमित्त आलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी यादव उभे राहिले असता त्यांचे प्रेम व शुभेच्छांचा वर्षाव बघून यादव हे भाऊक झाले. आलेल्या नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक,दिनेश यादव यांचे अनेक मित्र व कुदळवाडी परिसरातील शेकडो महिला व नागरिक उपस्थित होत्या.कोरोनामुळे सोशल डिस्टन्स चे यावेळी पालन करण्यात आले.