breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन- २०२२ : अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहर राष्ट्रवादी भोसरीत एकवटली!

नगरसेवक रवि लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
“महाईन्यूज” च्या “त्या” वृत्ताला अखेर मिळाली पुष्टी

पिंपरी । अधिक दिवे
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा नगरसवेक रवि लांडगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. भोसरीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रवि यांनी मान्यवरांकडून शुभेच्छाही स्वीकारल्या. त्यामुळे अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली भेासरी शहर राष्ट्रवादी एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले.
दरम्यान, “मिशन- २०२२ : भोसरी राष्ट्रवादीत खरे सूत्रधार अजित गव्हाणे; माजी आमदार विलास लांडे यांच्या केवळ राजकीय गुंड्या?” अशा मथळ्याखाली “महाईन्यूज” ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य दिन आणि रवि लांडगे यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी भोसरीत दाखल झाले.

मिशन- २०२२ : भोसरी राष्ट्रवादीत खरे सूत्रधार अजित गव्हाणे; माजी आमदार विलास लांडे यांच्या केवळ राजकीय गुंड्या?


यावेळी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, योगेश गवळी आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/230195174008918/posts/1438361433192280/

दुसरीकडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचाही आजच वाढदिवस आहे. यानिमित्त टीम राष्ट्रवादी पिंपळे सौदागरला रवाना झाली. यावेळी सर्वांसोबत मयूर कलाटे हेसुद्धा उपस्थित होते.

नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी केली असून, भोसरी मतदार संघात राष्ट्रवादी मुसंडी मारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

https://www.facebook.com/230195174008918/posts/1438378936523863/

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button