breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन- २०२२ : भोसरी राष्ट्रवादीत खरे सूत्रधार अजित गव्हाणे; माजी आमदार विलास लांडे यांच्या केवळ राजकीय गुंड्या?

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आता नवोदितांना संधी

युवा नेते पार्थ पवार आणि पक्षश्रेष्ठींकडून प्रचंड तयारी

पिंपरी । अधिक दिवे

आगामी महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व सूत्रे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हातात दिली आहेत. बूथ बांधणी, मतदार याद्या अध्ययावत करणे यासह प्रभाग निश्चितीबाबत गव्हाणे पक्षश्रेष्ठींच्या ‘कनेक्ट’ मध्ये आहेत. त्यामुळे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विलास लांडे केवळ ‘राजकीय गुंड्या’ करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भोसरीतील अजित गव्हाणे राष्ट्रवादीचा युवा दमाचा नवा चेहरा आहेत. युवा गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी भोसरी मतदार संघामध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये गुपितपणे काम सुरू ठेवले आहे. २००२ पासून आतापर्यंत म्हणजे सलग ४ वेळा गव्हाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युवा नेते पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सूक्ष्म’ लक्ष घातले असून, नवोदितांच्या खांद्यावर धूरा देण्याची भूमिका ठेवली आहे. याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आदी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुजोराही दिला आहे.
दुसरीकडे, माजी आमदार विलास लांडे यांनीही भोसरीच्या मैदानात ‘कसरत’ जोरदार सुरू केली आहे. वास्तविक, भोसरीत राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून लांडे यांनाच पहिली पसंती दिली जाते. पण, भाजपाला कडवा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘अजित कार्ड’ बाहेर काढण्याबाबत जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
निवडणूक प्रभाग रचना आणि आगामी निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयात गव्हाणे आणि राज्य सरकारशी संबंधित दोन अधिकारी निवडणूक विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे सिनीअर व्यक्तींना ‘निवृत्ती’ देत नवोदितांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज आणि प्रभाग रचनेचा अभ्यास करण्यापासून माजी आमदार लांडे यांना चारहात लांब ठेवण्यात आले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, राजकीय गुंड्या खेळण्यात वाकबगार असलेले आणि राजकीय फंडे वापरण्यात कायम अग्रेसर असलेले माजी आमदार विलास लांडे सक्रीय झाले आहेत. राजकारणात ‘पुराने चावल’ असलेल्या लांडे यांच्या गुंड्यांमुळे भाजपात खळबळ उडाली आहे. पण, त्याचे फायदा नक्की कोणाला होईल? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

अजित गव्हाणे यांनाच संधी का?
भोसरीतील गवळीनगर आणि सँडविक कॉलनी प्रभागातून अजित गव्हाणे यांनी चारवेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. सुमारे २० वर्षे राजकीय अनुभव असलेले गव्हाणे यांनी भाजपा लाटेतही आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा २०१७ मध्ये पराभव केला होता. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोफेशनल इथिक्स असलेला चेहरा म्हणून अजित गव्हाणे यांची ओळख आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी मिळावी, अशी महत्त्वाकांक्षा असलेल्या अजित गव्हाणे यांच्यावर २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भोसरीची संपूर्ण जबाबदारी देण्यात येईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button