पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मंत्रालयीन कर्मचारी निलंबित

पिंपरी l प्रतिनिधी

पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका मंत्रालयीन कर्मचाऱ्याने ऑनलाईन माध्यमातून लाच घेतली. हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत गेले असता आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन केले. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. 22) देण्यात आले आहेत.

महेंद्र नांदले (वय 40) असे निलंबित मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दिघी येथील लष्करातून निवृत्त झालेल्या दिवंगत नगरसेवकाच्या पत्नीने स्वतःच्या मालकी जागेत मुलाच्या नावे पेट्रोल पंप मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, भारत पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल पंप मंजूर केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात त्या जागेवर पोलीस ठाण्याचे आरक्षण असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेने जागा बदलून दुसऱ्या जागेवर पेट्रोल पंप मिळण्याची मागणी केली.

भारत पेट्रोलियम कंपनीने जुन्या जागेवर पंप सुरू करण्यास पोलिसांची हरकत असल्याचे प्रमाणपत्र मागितले. त्यामुळे तक्रारदार महिलेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. तत्कालीन मंत्रालयीन कर्मचारी परदेशी यांनी महिलेला प्रमाणपत्र दिले. मात्र, त्यामध्ये काही त्रुटी असल्याने भारत पेट्रोलियम कंपनीने त्यांना दुसरे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले.

त्यानुसार, तक्रारदार महिलेची मुलगी आयुक्त कार्यालयात येऊन सध्या नियुक्तीस असलेल्या नांदले याला भेटली. त्यावेळी नांदले याने प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार महिला आणि त्यांच्या मुलीने नांदले याच्या फोनपेवर एकूण साडेआठ हजार रुपये पाठवले. तसेच, वेळोवेळी आणखी रोख स्वरूपात पैसे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी संबंधित महिलेला बोलावून तिच्याकडे चौकशी केली. महिला तक्रार घेऊन आयुक्तांकडे गेली असल्याचे कळताच नांदले याने महिलेच्या फोनपेवर माघारी पैसे पाठवले. मात्र, आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button