breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी विधानसभेच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ची उडी!

धम्मराज साळवे यांचे पक्षश्रेष्ठींना पत्र : विधानसभा लढण्यास इच्छुक.. उमेदवारी द्या!

पिंपरी । आगामी काळात महाराष्ट्राच्या २०२४ विधानसभा निवडणूका जाहीर होतील त्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा २०६ हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून मी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज सावळे यांनी केली आहे.

मी पिंपरी विधानसभेतील रहिवासी असून २०१२ पासून सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभागी आहे. दिनांक ३१ मार्च २०१६ रोजी मा. अकील मुजावर साहेब यांच्या नेतृत्वात माझी पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती झाली होती तेंव्हापासून आजपर्यंत गेली ०८ वर्षांपेक्षा अधिक काळ मी पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करत आहे.पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या पदांवर कार्यरत आहे . गुजरात येथील सार्वत्रिक निवडणूक मध्ये पक्षाच्या आदेशानुसार (अहमदाबाद ,भरूच ,मडोसा ,गोध्रा )स्टार प्रचारक म्हणून सभा केल्या ,महाराष्टारील बीड ,जालना ,अहमदनगर ,पुणे येथे स्टार प्रचारक कार्य केले ,वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,अहमदनगर ,कोल्हापूर ,सांगली ,सातारा पक्ष बांधणी केले .

हेही वाचा – आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळ

२०१६ पासून AIMIM पक्षाच्या माध्यमातून जनहिताचे मुद्दे घेऊन अनेक आंदोलन मोर्चे केले तसेच शैक्षणिक,रोजगार,महिला सक्षमीकरण,आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात सातत्याने विविध कार्यक्रम,जनजागृती असेल अश्या सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका,राज्य सरकार यांच्यासोबत पत्रव्यवहार करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम असेल,दलित मुस्लिम समाज यांच्यावरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे असतील तसेच भ्रष्टाचाराची प्रकरणे असतील याविरोधात सातत्याने रस्त्यावरील व कायदेशीर संघर्ष केला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

तसेच, २०१७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक AIMIM पक्षाने प्रथमच निवडणूक लढवली होती.जय भीम जय मीम नारा देऊन सोशल इंजनिअरिंग चा प्रयोग करून १४ उमेदवार दिले होते त्यापैकी बहुजन समाजाचे ९ व मुस्लिम समाजाचे ५ उमेदवार दिले होते व या निवडणुकीत पिंपरी विधानसभेत पक्षाला १८५०० पेक्षा अधिक मतदान मिळाले होते. पिंपरी विधानसभेत दलित व मुस्लिम समाजाची संख्या निर्णायक असून पक्षाने उमेदवारी दिली तर विजय निश्चित आहे. युवा सुशिक्षित उमेदवार म्हणून निश्चितच मतदार संघात मला पसंती मिळेल, असा विश्वासही धम्मराज सावळे यांनी व्यक्त केला आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button