breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण १२ स्थिर सर्व्हेक्षण पथके स्थापन करण्यात आली आहेत.

ही पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांच्यामार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ मद्य, हत्यारे यांना प्रतिबंध करण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याठिकाणी नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.

याशिवाय सहा भरारी पथके कार्यरत करण्यात आलेली आहेत. या पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, एक पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार गुजरातच्या घश्यात घालणाऱ्या सरकारचा बदला घेण्याची ही योग्य वेळ’; मेहबूब शेख

निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांमार्फत घेण्यात येणार्‍या परवानगी प्राप्त प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा यांच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी चित्रीकरण करणेकामी एकूण पाच तडढ (तळवशे र्र्डीीींशळश्रश्ररपलश ढशरा) स्थापन करण्यात आली आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात आलेली भाषणे तपासणे तसेच उमेदवारामार्फत प्रचार सभा,

पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा दरम्यान वापरण्यात आलेले प्रचार साहित्य, वाहने, भोजन व्यवस्था व कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची आकडेवारीचा अहवाल विहीत नमुन्यात सहाय्यक खर्च निरीक्षक यांना पाठविला जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला व सहा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button