श्री स्वामी समर्थ पुण्यतिथनिमित्त दिघी येथे सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित दिघी मॅगझीन केंद्राच्या वतीने आयोजन

स्वामीभक्त भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
भोसरी : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिघी मॅगझीन चौक येथे 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्र व अध्यात्मिक विकास केंद्र, परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने तसेच पुणे जिल्ह्याचे ऊर्जा स्रोत सतीश मोरे यांच्या संयोजनातून भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे असून स्वामीभक्त नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सुरुवात 20 एप्रिल रोजी आमदार बंधू, उद्योजक कार्तिक लांडगे व प्रज्ञाताई लांडगे या दांपत्यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आली. या सामूहिक पारायण कार्यक्रमास हजारो स्वामी भक्ताने सामूहिक रित्या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले यात महिला भगिनींचा लक्षणीय सहभाग आहे. या कार्यक्रमादरम्यान आध्यात्मिक पारायणासोबत भूपाळी, आरती, नामजप, गणेश याग, चंडी याग, मल्हारी याग, स्वामी याग, दुर्गा सप्तपदी, श्री स्वामी चरित्र ग्रंथ वाचन सुरू आहे. त्यासोबत रक्तदान शिबिर बालसंस्कार शिबिर असे विविध उपक्रम सुरू आहेत.
सोहळ्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सेवेकर्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. यामध्ये रोहिश तापकीर, आनंदा फुले, विजय भोसले, मनोज काळे, शिवाजी पवार ,श्रीनिवास साखरे, अमोल शिंदे, विशाल घुले, बाळासाहेब गवळी, शाम हरकळ, रवी फटांगडे, राजकुमार जाधव, तेजस कोठावळे, गणेश साबळे, उज्वलाताई सांडभोर, कुंदाताई भोर, मनिषाताई निकम यांचा समावेश होता.
गुरुचरित्र पारायणामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन मनामध्ये आनंद चैतन्य प्रसन्नतेची अनुभूती मिळते अशा सामूहिक वाचन कार्यक्रमांमुळे भक्तांची आध्यात्मिक उन्नती होते या सोहळ्यामुळे दिघी भोसरी परिसरातील भक्तांना एकत्र येऊन आध्यात्मिक साधनेचा लाभ घेण्याची संधी मिळाली असून सोहळ्यात उपस्थित स्वामी भक्तांसाठी नवनाथ भजनी मंडळ तर्फे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्याकडून दररोज थंड शीतपेय वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाच्या सांगता दिनी महाआरती व महाप्रसाद
दिनांक 26 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिनी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते महाआरती करून सोहळ्याची सांगता होणार असून त्यानंतर भाविक भक्तांसाठी महा प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात असे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम सेवा केंद्राद्वारे घेण्यात येतील जास्तीत जास्त स्वामी भक्तांना एकत्र येण्याची व स्वामी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल असे रोहिश तापकीर व आनंदा फुले यांनी म्हटले आहे.