मोशी-प्राधिकरणमध्ये 12 हजार भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक ‘‘अग्निहोत्र’’
भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे व इंद्रायणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निलम लांडगे यांच्या पुढाकाराने अध्यात्मिक सोहळा

पिंपरी-चिंचवड : मोशी प्राधिकरण येथील त्रिवृक्ष संगम दत्त मंदिर परिसरात भव्य धार्मिक वातावरणात सामूहिक अग्निहोत्र आणि चैतन्य पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपा मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे आणि इंद्रायणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निलम लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित भक्तीमय सोहळ्यात 12 हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन त्रिवृक्ष संगम दत्त मंदिर, आमराई चॅरिटेबल ट्रस्ट, श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ (बाळप्पा मठ) आणि विश्व फाउंडेशन, शिवपुरी अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वैदिक मंत्रोच्चार आणि अग्निहोत्र विधीने झाली. सुमारे तीन हजाराहून अधिक भाविकांनी मोठ्या श्रद्धेने अग्निहोत्रात सहभागी होत चैतन्य पादुकांचे पूजन व दर्शन घेतले. परिसरात ‘स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.
हेही वाचा – नवनीत राणा रवी राणांच्या पक्षाविरोधात प्रचार करणार? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम! 
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण धार्मिक सोहळा पार पडला. त्यांनी अग्निहोत्राचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमानंतर सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बारा हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेविका रेखा टिंगरे, जेजुरी देवस्थानाचे संचालक अनिल सौंदडे, संत साई इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रमुख शिवलिंग ढवळेश्वर , सुरेशजी कर्डिले, जालिंदरजी शिंगारे, तसेच राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी निलम लांडगे, त्रिवृक्ष संगम दत्त मंदिर व आमराई चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
सामूहिक ‘‘अग्निहोत्र’’ आणि चैतन्य पादुका पूजन सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी याला “आध्यात्मिक पर्वणी” म्हणून गौरविले. “भारतीय परंपरेत अग्निहोत्र हे अतिशय पवित्र मानले जाते. या अग्निहोत्र आणि चैतन्य पादुकांच्या पूजनाने परिसरात सकारात्मक उर्जा आणि शांतीचा संदेश पसरला आहे.देव-देश अन् धर्म कार्यायासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– शिवराज लांडगे, मंडल अध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




