breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनोज तोरडमल यांची भाजपाच्या अनुसूचीत जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

पिंपरी | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचीत जाती मोर्चाचे माजी शहराध्यक्ष मनोज तोरडमल यांची ‘भाजपा अनुसूचीत जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी आमदार व भाजपा अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी तोरडमल यांना मुंबईतील बैठकीत नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी प्रदेश सचिव मनोज पवार, ज्येष्ठ नेते हिरा सहाणे, सचिन वाघमारे, गणेश साठे आदी उपस्थित होते.

बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोज तोरडमल यांनी पिंपरी चिंचवड शहरात शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य या क्षेत्रात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी उल्लेखनिय काम केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास करण्याचे भाजपाचे धोरण सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्यभर करेल. तसेच महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पोहचविण्याचे काम आगामी काळात करेल असे मनोज तोरडमल यांनी नियुक्ती प्रसंगी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button