महेशदादा तुम्हाला कोणतीही विरोधी ताकद रोखू शकत नाही: ह.भ.प दत्तात्रय आबा गायकवाड
![महेशदादा तुम्हाला कोणतीही विरोधी ताकद रोखू शकत नाही: ह.भ.प दत्तात्रय आबा गायकवाड](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/dada-1.jpeg)
- दिघीमध्ये आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात गौरवोद्गार
पिंपरी | प्रतिनिधी
भाजपा शराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या कामाचा झपाटा आणि या कामातून मिळालेल्या प्रसिद्धीचा वारू हा संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धावत आहे. आता दादांचा हा वारू कोणतीही विरोधी ताकद रोखू शकत नाही, असे मत ह.भ.प दत्तात्रय आबा गायकवाड यांनी व्यक्त केले.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि 29) दिघीमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन उदय दत्तात्रय गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प.श्री दत्तात्रय आबा गायकवाड, उपमहापौर हिरा नानी घुले, नगरसेविका निर्मला गायकवाड, भोसरी- चऱ्होली भाजपा मंडल अध्यक्ष उदय गायकवाड, माजी नगरसेविका आशा सुपे, विनायक वाळके, दत्तात्रय परांडे, मेजर अशोक काशीद, कुंडलिक परांडे, संजय गायकवाड उपस्थित होते.
- कार्यक्रमाच्या सुरवातीला दिनदर्शिका- २०२२ चे लोकार्पण करण्यात आले…
या कार्यक्रमावेळी किल्ले स्पर्धा २०२१ बक्षीस वितरण समारंभ आणि समाजामध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिघी परिसरामधील ३०० कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सांप्रदायिक स्वरूपात पगडी, तुळशीहार आणि शक्तीचे प्रतीक म्हणून हनुमानाची मुर्ती भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय गायकवाड यांनी केले.
यावेळी ह.भ.प दत्तात्रय आबा गायकवाड म्हणाले की, गेल्या दहा वर्षात आमदार महेश लांडगे यांच्या विकास कामाचा झपाटा आणि कामाचा आवाका या भागातील नागरिकांनी पाहिला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी कायमच सर्वसमावेशक, अशी भूमिका ठेवून अनेक कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. महेशदादांच्या कार्याचा आणि प्रसिद्धीचा वारू हा संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धावत आहे. कोणतीही विरोधी ताकद आता महेशदादांना रोखू शकत नाही.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले.
- आमदार लांडगे यांच्या पाठीशी युवकांची फौज : उदय गायकवाड
आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सेवा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी जी सेवा केली. यांच्या कार्याची शब्दात परतफेड करू शकत नाही. इतके महान कार्य यांनी केले. त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आमदार लांडगे यांच्या हातून समाजकार्य होत राहो. त्यासाठी युवकांची फौज त्याच्या पाठीशी राहील, असा विश्वास उदय गायकवाड यांनी व्यक्त केला.