breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

..अन्यथा पावसाचा चिखल क्षेत्रीय कार्यालयासमोर टाकणार!

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी खडसावले

क-क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला इशारा

पिंपरी | प्रतिनिधी

पावसाळा सुरू झाला असून, नालेसफाई आणि रस्ते दुरूस्तीची कामे अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे तातडीने सर्व कामे मार्गी लावा, अन्यथा पाणी साचल्यामुळे निर्माण झालेला चिखल क्षेत्रीय कार्यालयाच्या दारात टाकणार, असा इशारा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील क-क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पावसाळापूर्व कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, महापालिका मुख्य अभियंता मकरंद निकम, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा       –      भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेशी भिडणार; भारतीय वेळेनुसार किती वाजता सामना सुरु होणार? 

यावेळी क- क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बो-हाडेवाडी, वुड्स व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी, धावडे वस्ती, भगत वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सद्गुरुनगर, जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रिय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडे वस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर तसेच, टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, अंतरिक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरुनगर आदी भागांतील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात आला.

ड्रेनेज सफाई वाहनांची संख्या वाढवा..

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील प्रत्येक्ष क्षेत्रीय कार्यालयांकडून ड्रेनेज सफाई करणारे एकच वाहन सध्या आहे. वाढती लोकसंख्या आणि ड्रेनेजच्या तक्रारींचा आलेख पाहता अशा वाहनांची संख्या वाढवावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली. यासह सारथी आणि परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी सतर्क रहावे, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button