breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Lockdown : वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांची ससेहोलपट, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांनी आपल्या मुळ गावी जाण्यासाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी भोसरी रुग्णालयासमोर गर्दी केली होती. आज सकाळी ८ वाजल्यापासून नागरिकांनी रुग्णालयासमोर भली मोठी रांग केली होती.

Lockdown मुळे शहरात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यासाठी कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावला. गावी जाण्यासाठी पास घ्यावा लागतो. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांनी भोसरी रुग्णालयसमोर भली मोठी रांग केली होती. सकाळी ८ वाजता हे नागरिक रुग्णालयासमोर रांगेत उभे होते.

हे प्रमाणपत्र देण्यासाठी खासगी रुग्णालयांना आदेश दिले असले तरी याबाबत नागरिकांना माहिती देण्यात पालिका प्रशासन कमी पडले आहे. असे प्रमाणपत्र देण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून टाळाटाळही केली जाते आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button