ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

देशाच्या स्वाभिमानाची निशाणी तिरंगा डौलाने फडकत राहो!

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना : शहर भाजपातर्फे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

पिंपरी : भारतवासीयांची आण-बाण आणि शान असलेला, आपल्या देशाच्या स्वाभिमानाची निशाणी असलेला तिरंगा ध्वज असाच डौलाने फडकत राहो यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर पक्ष कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जगताप यांनी शहरवासीयांना ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याप्रसंगी उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश अमरजी साबळे, विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, संजय मंगोडेकर, माऊली थोरात, तेजस्विनी कदम, आशा काळे, कोमल शिंदे, कमलेश भरवाल,सौ. गीता महेंद्रु, राजश्री जायभाय, रेखा कडाली, पुष्पा सुबंध, शोभा गराडे, पांडे, देवदत्त लांडे, प्रकाश जवळकर, कैलास सानप, गणेश वाळुंजकर, निखिल अमृतकर आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button