स्व. केशवराव वाडेकर चिल्ड्रेन्स पार्कचे आज होणार उद्घाटन
![स्व. केशवराव वाडेकर चिल्ड्रेन्स पार्कचे आज होणार उद्घाटन](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210629-WA0297-1-e1625018163148.jpg)
तळेगाव | पंचायत समिती व जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. केशवराव वाडेकर चिल्ड्रेन्स पार्कचे उद्घाटन आज बुधवारी (दि.30) सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती मावळ तालुका भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.
स्व. उषाताई अरविंद पिंगळे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या पुढाकाराने व वडगाव शहर भाजपच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या स्व. केशवराव वाडेकर चिल्ड्रेन्स पार्कचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते, प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, मावळ भाजपा अध्यक्ष, महिला मोर्चा सायली बोत्रे, पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पंचायत समिती सदस्य सुवर्णा कुंभार, जिजाबाई पोटफोडे, ज्योती शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.