स्मार्ट सिटी मिशनचे सह सचिव कुणाल कुमार यांनी केली शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी
![Kunal Kumar, Joint Secretary, Smart City Mission, inspected the work of Smart City in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/pjimage-4-1.jpg)
राज्यात “पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी” विकास कामांत आघाडीवर
पिंपरी चिंचवड | गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली आहे. राज्यात पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे, सोलापूर ही शहरे स्मार्ट सिटी विकास कामांत आघाडीवर आहे. ही तिन्ही शहरे जुलै 2023 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करतील, अशी अपेक्षा असून विकास कामांचा वेग लक्षात घेवून नागरिकांसाठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प कसे उपयुक्त् ठरतील, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर तथा सह सचिव कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. व्हॉटसअप, फेसबुक तसेच प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पांची जनजागृती करा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.
आज (सोमवारी) सकाळी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या एबीडी व पॅन सीटी प्रकल्पांची पाहणी कुणाल कुमार यांनी केली. त्यानंतर ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड व पुणे स्मार्ट सिटीच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी अधिका-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, शहर अभियंता तथा सहमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, महाव्यवस्थापक अशोक भालकर, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह पुणे स्मार्ट सिटीचे अधिकारी व सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
कुणाल कुमार यांनी प्रोजेक्टरद्वारे सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किओक्स, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, मुन्सीपल ई– क्लास रुम, स्कुल हेल्थ मॉनिटरिंग, पब्लीक ई- टॉयलेट, सिटी मोबाईल ऍ़प अँड सोशल मिडीया, ई-क्लास रुम, पर्यावरण सेन्सर, स्मार्ट ट्राफिक, सिटी सर्व्हेलन्स, स्मार्ट पार्कींग इन्क्लुडींग मल्टीलेव्हल कार पार्क, इंटीग्रेटेड कमांड कट्रोल सेंटर, ऑप्टीकल फायबर केबल, स्मार्ट वाटर सप्लाय, पब्लीक वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट सेव्हरेज, आयसीटी इनॅबल एसडब्लुएम, स्ट्रीटस्केप इन्क्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, टयु पार्क अँड स्मार्ट टॉयलेट इन एबीडी, जीआयएस इनॅबल इआरपी इन्क्लुडींग मुनिसीपल सर्व्हीस लेव्हल बेंच मेकींग, युनीक स्मार्ट ऍ़ड्रेसिंग अँड ऑनलाईन इस्टॅब्लीशमेंट लायसींग्स या प्रकल्पांची माहिती घेतली. तसेच, निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.
तत्पूर्वी, पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत राजमाता जिजाऊ उद्यान व पार्किंग व्यवस्था, रस्ते, फुटपाथ, आझादी का अमृत महोत्सव निमीत्त ज्येष्ठ नागरिकांसाठीची ओपन जिम, बैठक व्यवस्था, सुदर्शन चौक येथे सलग 75 तासांत उभारण्यात आलेले “8 टू 80 पार्क”ला भेट दिली. तसेच शहरामध्ये अर्बन स्ट्रीट अंतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते व सायकल ट्रकची पाहणी केली. त्याचबरोबर, विकासकामासंदर्भात नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून प्रकल्पांबाबत त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेत कौतुक केले.