पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनामुळे निधन; एक हसतमुख व्यक्तिमत्व हरपले
पिंपरी । प्रतिनिधी
दिघी येथे राहणारे पत्रकार गणेश पोपट थोपटे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची कोरोनाशी झुंज अखेर अपयशी ठरली व प्राणज्योत मालवली.
गणेश थोपटे यांच्या अचानक जाण्याने थोपटे परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ व वहिनी असा परिवार आहे.
गणेश थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात मुक्त पत्रकारिता करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व राजकीय विषयांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांJournalist Ganesh Thopte dies due to corona; Lost a smiling personalityनी केले होते. तसेच सामाजिक कार्यातही व कुणाच्याही मदतीसाठी ते कायम अग्रेसर असत.
राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात ते पारंगत होते. त्यांनी डेक्कन येथील रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेे. तर सध्या ते पिंपरी येथील डी.वाय. पाटील विद्यालयात शेवटच्या वर्षाचे कायदेविषयकचे (LLB) शिक्षण घेत होते. आणि एका आयटी कंपनीमध्येही ते चांगल्या पोस्ट वर काम करत होते.
त्यांचा हसतमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्त्व व कायम प्रत्येकाला मोलाचे मार्गदर्शन करणे तसेच मनमिळावू स्वभाव. यामुळे सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने कुटुंब, मित्र, आप्तेष्ट तसेच परिसरतील रहिवाशी हळहळ व्यक्त करत आहेत.