वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे आपले नैतिक कर्तव्य : उज्ज्वला गावडे
![It is our moral duty to help organizations working for the underprivileged: Ujjwala Gawde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/071edcea-d126-49a8-bf79-690b7ded8c82.jpg)
- भाजपा महिला मोर्चाच्या पुढाकारातून समरसता गुरुकुलम येथे अन्नधान्य तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
पिंपरी | प्रतिनिधी
समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपा पिंपरी- चिंचवड शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे अन्नधान्य तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी गावडे बोलत होत्या.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरचिटणीस कुंदा भिसे, कविता भोंगाळे, उपाध्यक्ष सरिता नेवाळे, कोषाध्यक्ष अस्मिता भालेकर, मंडल अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, वैशाली जवळकर उपस्थित होत्या.
भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे यांच्या पुढाकारातून एक तेलडबा, तांदूळ १०० किलो, गहू १० किलो, तूरडाळ १० किलो तसेच शालेय विद्यार्थ्यांना ५० वह्यांचे वाटप करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा समर्पण सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम हे फासे पारधी समाजातील मुलांसाठी मोठे काम करत आहे. यांना नैतिक कर्तव्य म्हणून आज अन्नधान्य तसेच येथील मुलांना शालेय साहित्य दिले आहे.
– उज्ज्वला गावडे,
शहराध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा, पिंपरी- चिंचवड.