Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नव्या पिढीसाठी अण्णासाहेब पाटील आजही आदर्श; इरफान सय्यद

अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अभिवादन

पिंपरी चिंचवड | स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांचे कार्यदीप स्तंभा सारखे आहे. माथाडी कामगारांच्या आयुष्यात त्यांच्या संघर्षामुळे नवी पहाट निर्माण झाली. त्यांचे कार्य आजही नव्या पिढीसाठी आदर्श आहे असे मत शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक आणि माथाडी कामगार चळवळीचे प्रणेते स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या निमित्त चिंचवड येथील के एस बी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळे माथाडी कामगारांना हक्काचे स्थान प्राप्त झाले त्यांचे जीवनकार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून कामगार चळवळीला दिशा देणारे आहे.

हेही वाचा       :        भारताची अग्नि प्राइम मिसाइलची यशस्वी चाचणी

कार्यक्रमात महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, कार्याध्यक्ष परेश मोरे,जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव तसेच पांडुरंग कदम, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग पठारे, अशोक साळुंखे, सतीश कंटाळे, गोरक्ष दुबाले, समर्थ नाईकवाडे, नागेश व्हनवटे, मनोज मंजाळ, अमित पासलकर, बबन काळे, दादा कदम, उद्धव सरोदे, माऊली पाचपुते, श्रीकांत मोरे, भारत मंजाळ, काळोखे मामा, विश्वनाथ गांगड, नाना नाईकवाडे, विजय खंडागळे, गिरीश देशमुख, रतन भोजने, आयुष शिंदे, गणेश नाइकवाडे, भरत मंजाळ आदी पदाधिकारी विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम आणि मोठ्या संख्येने सभासद कामगार उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा जागर करण्यात आला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button