यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे अविष्कार संशोधन स्पर्धा
![New posts for Municipal Education Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/education-1.jpg)
पिंपरी :व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन गुणांचा विकास व्हावा, त्यांना विविध संशोधन पद्धतींची सविस्तर माहिती व्हावी या हेतूने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. संशोधन विषयाचे शीर्षक, उद्दिष्ट, संशोधन कार्यपद्धती व संशोधनाचा निष्कर्ष अशा मुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपापल्या संशोधन विषयाचे सादरीकरण केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/ads-def-1-1024x731.jpeg)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे (आयआयएमएस) डोकार डॉ. शिवाजी मुंढे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत संशोधन पद्धतीचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचार प्रवणता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या सादरीकरणाला व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.
डॉ. वंदना मोहंती, डॉ. वैभव पाटील व प्रा. प्रशांत वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सिद्धराम सोमेश्वर व देवव्रत ढमढेरे, श्रीपाद देशपांडे व गौरव केदारी आणि सरिता साळुंके व आनंद कुमार साहू हे तीन संघ या स्पर्धेत विजयी ठरले. हे तीन संघ आता विभागीय स्तरावरील अविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील यांनी केले.