ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवछत्रपती लिनिअर गार्डनच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार!

महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश : भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची पाहणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डनची भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आज उद्यान विभाग व स्थापत्य उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान गार्डनमधील स्वच्छता, सुशोभीकरण आणि हिरवाई वाढविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

काटे यांनी गार्डनमधील हॉर्टिकल्चर लॉनचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर देत अतिरिक्त वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याचे निर्देश दिले. तसेच झाडांच्या पानगळतीमुळे गार्डनमध्ये साचलेला कचरा व राडारोडा तातडीने उचलण्यास सांगितले. परिसर अधिक आकर्षक आणि देखणा करण्यासाठी नवीन लॉन लावणे, विविध रंगांची फुलझाडे लावणे तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

लावलेल्या झाडांना नियमित पाणी देऊन ती हिरवीगार व तंदुरुस्त ठेवण्यावर विशेष भर देत काटे यांनी नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेले वातावरण मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा      :                पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; ४ जण ठार, १५ जखमी

यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “शिवछत्रपती लिनिअर गार्डन हे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या उद्यानात स्वच्छता, सुशोभीकरण आणि हिरवाई राखणे अत्यंत आवश्यक आहे. गार्डन अधिक सुंदर व आकर्षक बनविण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व हिरवेगार वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे.”

या पाहणीवेळी नगरसेविका सौ. अनिताताई काटे व नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांनीही उपस्थित राहून उद्यानाच्या देखभाल व सुशोभीकरणाबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पिंपळे सौदागर परिसरातील शिवछत्रपती लिनिअर गार्डन हे नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. या उद्यानात स्वच्छता, सुरक्षितता आणि हिरवाई कायम राखण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील. गार्डन अधिक सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक बनवून नागरिकांना उत्तम वातावरण मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

– शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button