Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; ४ जण ठार, १५ जखमी

Pakistan-Afghanistan War | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांमधील तणाव पुन्हा वाढला असून पाकिस्तानने राजधानी काबूलसह अफगाणिस्तानातील विविध भागांवर रात्रीच्या वेळी हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने कंदाहार विमानतळाजवळील एका खासगी विमान कंपनीच्या तेल साठ्यावर बॉम्बहल्ला केला. पाकिस्तानी लष्कराने या कारवाईबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी संरक्षण विभागाशी संबंधित सूत्रांनी वृत्तसंस्था एएफपीला याची माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा       :            राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; काही ठिकाणी गारपिटीची शक्यता 

अफगाणिस्तानकडून दावा फेटाळला

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांना आसरा दिल्याचा आरोप अफगाणिस्तावर केला जातो. पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांसाठी यानांच जबाबदार धरण्यात आले होते. अफगाणिस्तानकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत. अफगाणिस्तानच्या जमिनीची वापर दुसऱ्या देशावर हल्ले करण्यासाठी केला जात नाही, अशी भूमिका तालिबान सरकारने मांडली.

चार ठार, १५ जखमी

काबूलमधील नागरी वस्तीत बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती काबूल पोलिस खलिल जदरान यांनी दिली आहे. यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हल्ल्याची माहिती दिली आहे. दक्षिणेकडील कंदाहार प्रांत तसेच पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पक्तिया आणि पक्तिका या पूर्वेकडील प्रांतांवरही हल्ला झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button