क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

झुरिचमध्ये भारताचा तिरंगा फडकला; समिप्ता वाव्हळने पटकावला रौप्यपदक

38th Sri Chinmoy Marathon Swim स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत घवघवीत यश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

आपल्या परिसरातील समिप्ता गणेश वाव्हळ हिने स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 38th Sri Chinmoy Marathon Swim या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत भारताचा तिरंगा सातासमुद्रापार अभिमानाने फडकवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरासह संपूर्ण देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दि. 19 जुलै 2026 रोजी रॅपर्सविल-झुरिच (स्वित्झर्लंड) येथे पार पडलेल्या या स्पर्धेत समिप्ताने भारताचे प्रतिनिधित्व केले. जगभरातील विविध देशांतील जलतरणपटूंमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

लहानपणापासून जलतरणाची आवड जोपासणाऱ्या समिप्ताने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा

प्रगती महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबची स्थापना

समिप्ताच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नागरिक, क्रीडाप्रेमी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

“समिप्ताने केवळ पदक जिंकले नाही, तर भारताचा गौरव वाढवत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. तिची ही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे,” अशा भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशानंतर समिप्ताकडून भविष्यात आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button