दापोडी येथील मोरया कोविड केअर सेंटरचे उद्घाटन; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची उपस्थिती
![Inauguration of Morya Kovid Care Hospital at Dapodi; Presence of Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishnaprakash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/sp-krushnprakash-mahesh-shete-1.jpg)
- ३० बेडसह ७ ऑक्सिजन बेड, प्राईव्हेट रुमचीही सुविधा
पिंपरी । प्रतिनिधी
दापोडी येथील गौरी अपार्टमेंटमध्ये मोरया कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, दापोडीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साबळे, विनायक वरपे, जयंत डांगरे, डॉ. पवन लोढा, डॉ. वैशाली लोढा, डॉ. रामकुमार निकाळजे, डॉ. महेश शेटे, डॉ. दिपक गोरे, डॉ. रेणुका कोल्हे, डॉ. किरण साबळे, अमर बिराजदार, विशाल निकाळजे, सचिन पाटील, रविराज साबळे, कैलास मोरे सुहास साळुंखे आदी उपस्थित होते.
***
कोविड केअर सेंटरमधील सुविधा…
३० जनरल बेड, ७ ऑक्सिजन बेड, ८ सेमीप्राईव्हेट रुम, ४ प्राईव्हेट रुम आणि जनलर वॉर्डमध्ये १० बेड अशी सुविधा या कोविड केअर सेंटरमध्ये आहे, अशी माहिती डॉ. महेश शेटे यांनी दिली.
***
तज्ञ डॉक्टरांची टीम…
डॉ. राजकुमार निकाळजे यांनी आतापर्यंत दीड हजारहून अधिक कोविडग्रस्त रुग्णांना बरे केले आहेत. तसेच, कोविड काळात पूर्णवेळ काम करण्याचा अनुभव असलेली टीम मोरया कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा करणार आहे. त्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असा विश्वास डॉ. महेश शेटे यांनी व्यक्त केला.