Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविडच्या तिस-या लाटेत लहान मुलांची विशेष काळजी घेणार – आयुक्त राजेश पाटील

  • प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहण्याच्या सुचना
  • लहान मुलांच्या काळजीसाठी पालकांमध्ये जनजागृती करणार

पिंपरी |महाईन्यूज|

कोविड-19 च्या संभाव्य तिस-या लाटेचा विचार करुन महापालिकेचे वायसीएम, जिजामाता रुग्णालयात प्रत्येकी 150 बेड व 30 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच घरकूलच्या चार इमारतीत लहान मुलं व पालकांसाठी स्वतंत्रपणे आयसोलेशन विभाग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी बालरोग तज्ञांचे टास्क फोर्स तयार केले असून त्याच्या मार्गदर्शनानूसार पिंपरी चिंचवडमध्ये योग्य औषधोपचार करण्यात येतील, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोविड-१९ च्या संभाव्य तिस-या लाटेबाबत महापालिका वैद्यकीय सेवा सुसज्ज ठेवण्यात येत आहे. शहरातील बालरोग तज्ञाचे टीम तयार केली आहे. वाय.सी.एम.एच. रुग्णालयामध्ये १५० बेड, 30 आयसीयू बेड, लहान मुलांसाठी १५-१५ बेडचे दोन आय.सी.यू. राखीव ठेवण्यात येईल. पिंपरीच्या जिजामाता रुग्णालयात देखील लहान मुलांसाठी कोविड विभाग तयार करुन 150 ऑक्सिजन बेडची सोय करण्यात येणार आहे. तसेच घरकूल येथील चार इमारती आयसोलेशन म्हणून वापरण्यात येणार आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील 150 बालरोग तज्ञ डॉक्टर्स आणि रुग्णालये गरज भासल्यास मदत घेणार आहे. पिंपरीचे डी.वाय.पाटील रुग्णालयात देखील लहान मुलांचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. याबाबत लहान मुलांच्या अनुषंगाने सर्व साहित्य, उपकरणे, लहान मुलांसाठीचे वेंटीलेटर्स उपलब्ध करणे व त्यासाठी लागणारा मनुष्यबळ व आवश्यक तो औषधे साठा तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button