breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गेल्या सात वर्षांमध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, हीच मोदींच्या कार्याची पावती

  • केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला दोन वर्षे पूर्ण  
  • भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मोदी सरकारच्या कार्याला केला ‘सलाम’

पिंपरी / महाईन्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची दुसरी टर्म लक्षात घेऊन सलग सात वर्ष वेगवेगळ्या पातळीवर अभिमानास्पद कामगिरी केंद्र सरकार करत आहे. कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराचा किंवा भ्रष्टाचाराचा आरोप सरकारवर झालेला नाही. ही सरकारची जमेची बाजू आहे. याशिवाय आर्थिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रात सरकारच्या सकारात्मक कार्यपद्धतीचा ठसा अगदी ठळकपणे जाणवतो. देशात पहिले स्थापन झालेले सरकार असो किंवा प्रत्येक सरकारचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता लालबहादूर शास्त्री आणि अटल बिहारी वाजपेयी हे दोन अपवाद वगळता सर्व केंद्र सरकारांवर गैरव्यवहाराचे आरोप झालेले आहेत. मात्र, या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारवर एकही आरोप झालेला नाही. ही अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. केंद्र सरकार वेगवेगळ्या क्षेत्रात परिवर्तन व सुधारणा करीत आहेत. पंतप्रधानांनी कोविड काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फंडातून त्यांचे पूर्ण पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केंद्र सरकारच्या सात वर्षातील यशस्वी कामकाजाचे कौतुक केले आहे.

आत्मनिर्भर भारत या क्रांतिकारक योजनेअंतर्गत अर्थव्यवस्थेची दिशा बदलताना आपण सर्वांनी पाहिली आहे. छोट्या जागी छोटे व्यवसाय व व्यवसायांचे विकेंद्रीकरण, आर्थिक पॅकेज देत उद्योग व्यवसायांना चालना दिली. त्यातून रोजगार निर्मिती त्याचबरोबर मध, वनस्पती, मासेमारी अशा दुर्लक्षित क्षेत्रात प्रोत्साहन व उद्योजकांना चालना या सरकारने दिली. याचा फायदा शेतकरी व व्यावसायिकांनी चांगल्या पद्धतीने घेतला आहे. या सर्व ध्येयनिष्ठ उपक्रमांमधून रोजगार निर्मितीची साखळी निर्माण झालेली आहे. शेती क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पिक विमा योजना खतपुरवठा योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या गेल्या. खतांचा काळाबाजार, खतांचा तुटवडा, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना होणारा त्रास या बातम्या पूर्वी सातत्यानं असायच्या, परंतु या सात वर्षांत या अशा बातम्यां आपल्याला दिसल्या नाहीत. मागासवर्गीय जनतेसाठी अनेक योजना या सरकारच्या काळात पूर्णत्वास आलेल्या प्रामुख्याने दिसल्या आहेत, मागासवर्गीयांसाठीचा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा निर्णय हा खऱ्या अर्थाने सरकारचा ऐतिहासिक निर्णय ठरला. मागासवर्गीय जनतेसाठी विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणासाठीचा महत्त्वाचा निर्णय ठरलेला आहे, याचे देशभरातून मोठे कौतुक झाले, असे गोरखे यांनी म्हटले आहे.

मोदींनी भारतीयांच्या संपन्नतेचा मार्ग उज्वल व प्रशस्त केला

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे महत्त्वाचे काम या सरकारच्या काळात झाले. म्हणूनच कोरोना काळात मोठ्या प्रकारे मदत आपल्याला बाहेरच्या राष्ट्रांनी केलेली दिसली. भारतीय युवा पिढीच्या मनात आत्मनिर्भर होणे या उद्देशाचा उगम छोट्या-छोट्या योजनातून अतिशय प्रामाणिकपणे केलेला दिसत आहे. पुलवामा वगळता देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक दहशतवादी कारवायांना भारताने सणसणीत उत्तर जागेवरच दिलेले आहे. यामुळे भारतीय संरक्षण दलाचे व भारतातील नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम मोदी सरकारने समर्थ पणे केलेले आहे. मोदींनी मन की बात द्वारे रेडीओ सारखे जवळपास निष्क्रिय झालेले माध्यम पुन्हा जिवंत केले. देशाच्या कानाकोपर्‍यात स्वतःचा विचार पोचवला. मन की बात कार्यक्रम संपूर्णतः राजकीय ठेवून तो समाजातील तळागाळातील अमुलाग्र परिवर्तन करणाऱ्या अनेक व्यक्तींचा भारताला परिचय करून दिला. तसेच, अनेक मूलभूत गरजांकडे देशाचे नेहमीच दुर्लक्ष असायचे, अशा दुर्लक्षित मूलभूत गरजा थेट पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरील आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून “स्वच्छतागृह बांधण्याचे” आवाहन केले, अशा मूलभूत गोष्टीकडे सर्व देशाचे लक्ष वेधले. आज अब्जाहून अधिक भारतीयांच्या पाठबळामुळे मोदींनी भारतीयांच्या संपन्नतेचा मार्ग खऱ्या अर्थाने उज्वल व प्रशस्त केला आहे. केंद्र सरकारला यशस्वी दुसऱ्या पर्वाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत, अशा शब्दांत गोरखे यांनी मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button