शहरात वाहन चोर सुसाट, विविध भागातून पाच दुकाची चोरीली
![Zakir Hussain Sheikh from Jogeshwari in the custody of Mumbai Police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/crime-registered-patangbaj_202101544305-e1625639033763.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरात सध्या वाहन चोर सुसाट असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकण, दिघी, चिखली आणि हिंजवडी परिसरातून या दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
चाकण मधील चौधरी धाब्यासमोरील पार्किंगमधून तीस हजारांची दुचाकी (एमएच 14 एफ क्यू 8904) चोरीला गेली आहे. याप्रकरणी मनोज फसले (वय 34) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 21 जुलै 2021 रोजी ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दुसरी घटना निघोज येथील महिंद्रा गेट नं 02 समोरील पार्किंग येथे घडली. याप्रकरणी चंद्रशेखर तेली (वय 35) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची (एमएच 13 बीजी 6806) ही दुचाकी चोरीला गेली आहे. 04 ऑगस्ट 2021 रोजी ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
याप्रकरणी प्रशांत डोंगरे (वय 27) यांची (एमएच 14 जी एफ 4691) ही तीस हजार रूपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. 19 ते 20 जुलै दरम्यान आदर्शनगर, दिघी या ठिकाणी हा प्रकार घडला. डोंगरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवतेज नगर, चिंचवड येथून 5 ऑगस्ट रोजी दुचाकी (एमएच 14 क्यू 9806) चोरीला गेली आहे. याप्रकरणी विजयकुमार ज्ञानदेव पाटील (वय 47) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंडवडी येथील एमक्युअर कंपनी गेटच्या बाहेरून 5 ऑगस्ट रोजी दुचाकी (एमएच 14 ई एक्स 5480) चोरीला गेली आहे. याप्रकरणी उमेश रमेश जाधव (वय 25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.