breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी ‘कोविशिल्ड’चे 8 केंद्रांवर लसीकरण

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी (दि.21) ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस 8 केंद्रांवर देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 150 जणांना लस देण्यात येणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या (शुक्रवारी) महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना 15 मे 2021 पासून ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि अहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी या केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button